Homeताज्या बातम्याआठ दिवसाच्या आत सासवड शहरातील रस्ते ड्रेनेज आणि पथ दिव्यांची कामे...

आठ दिवसाच्या आत सासवड शहरातील रस्ते ड्रेनेज आणि पथ दिव्यांची कामे झाली नाही तर या तारखेला गाव बंद आंदोलन करण्याचा मा.आमदार संजय जगताप यांचा मुख्यअधिकाऱ्यांना इशारा …

प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज
तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या सासवड नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे ढेपाळला असून, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे नागरिक हैराण झाले

आहेत. विशेषतः गावठाण भागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज, पथदिवे आणि रस्त्यांची दुरवस्था ही गंभीर समस्या बनली

आहे. या विरोधात माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. ११) मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना घेराव घालून तीव्र निदर्शने केली.
सासवडमध्ये सध्या स्वच्छतेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. जागोजागी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत आहे

घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, तर जुन्या जलवाहिन्यांमुळे पिण्याच्या पाण्यात गटारीचे पाणी मिसळत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. शहरात भाजी विक्रेत्यांसाठी निश्चित जागा नाही, डुकरे आणि भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. बंद असलेली उद्याने आणि महत्त्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलकांचा अभाव अशा अनेक समस्या यावेळी समोर आल्या.

याप्रसंगी बोलताना माजी आमदार संजय जगताप यांनी प्रशासनावर निधी अडवल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, सासवडचे नाव खराब करण्यासाठी प्रशासन जाणूनबुजून विकासकामांमध्ये अडथळे आणत आहे आणि निधी नसल्याचे कारण देत आहे. जर येत्या आठ दिवसांत शहरातील रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि पथदिव्यांची कामे

झाली नाहीत, तर १९ ऑगस्ट रोजी ‘गाव बंद’ आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण यांना  दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंधात्मक आदेश जारी पूर्वपरवानगीशिवाय ड्रोन उडविल्यास कारवाई..

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन कॅमेराचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार...

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

error: Content is protected !!