Homeताज्या बातम्याशिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी...

शिवहार लहाने यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड

प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज

म.ए.सो वाघीरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सासवड येथील  शिक्षक शिवहार लहाने यांची अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाशी संलग्न असलेल्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यवाह पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पुणे जिल्हाध्यक्ष निलेश काशीद यांनी शिवहार लहाने यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही शिक्षकहित, शिक्षणहित व राष्ट्रहित या विचाराने कार्य करणारी शिक्षकांची अग्रगण्य राज्यव्यापी संघटना असून आजपर्यंत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघातून अनेकवेळा या शिक्षक संघटनेच्या व्यक्तींनी शिक्षकांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. आगामी काळात पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटनात्मक काम

प्रभावीपणे करून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध शैक्षणिक समस्या सोडविणे तसेच पुणे जिल्ह्यात शाळा तिथे शिक्षक परिषदेचा कार्यकर्ता हा उपक्रम राबविणार असल्याचा निर्धार सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध शैक्षणिक व शासन स्तरावरील समस्यांची सोडवणूक व्हावी यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी पुणे येथे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संवाद बैठक आयोजित केली

जाईल, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत यासाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी काम

करणार असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून सांगितले. आगामी नोव्हेंबर – डिसेंबर २०२६ मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवहार लहाने यांची झालेली निवड महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या

संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. लहाने यांचा पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शिक्षकांचा असलेला थेट संपर्क संघटनेच्या विस्तारासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणूनाथ कडू, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, नागपूर विभागाचे माजी शिक्षक आमदार नागो. गाणार, पुरंदर विधानसभा

मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे, आमदार राहुल कुल, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार अशोक टेकवडे, राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, पुणे विभागाचे संघटन मंत्री रामदास अभंग, संजीव मांढरे

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे, प्राचार्य दत्ताराम

रामदासी,प्राचार्य अशोक दहिफळे, भाऊसाहेब खोसे.

प्राचार्या पूजा जोग, महेश शेलार, दिपक भोसले, राजेंद्र बडे,अरुण खेडकर, दत्तात्रय गायकवाड विजय पिलाने आदींनी अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मद्यधुंद कार चालकाची दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दोन...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज मद्यधुंद कारचालकांने दोन टू व्हीलर ला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे याबाबत फिर्यादी - प्रकाश राजाराम काकडे वय...

द. महाराष्ट्र न्यूज इफेक्ट वाघीरे महाविद्यालयासमोर अखेर प्रशासनाने स्पीडब्रेकर बसविला

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :द. महाराष्ट्र न्यूज इफेक्ट वाघीरे महाविद्यालयासमोर अखेर प्रशासनाने स्पीडब्रेकर बसविला सासवडून बापदेव मार्गे पुण्याकडे जाणाऱ्या या रोड शेजारी   शाळा आहे येथून अनेक...

सासवडला हिंदुत्वाची ललकार! 18 एप्रिल ला भव्य दिव्य हिंदू संमेलनाचे आयोजन

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवडला हिंदुत्वाची ललकार! 18 एप्रिल ला भव्य दिव्य हिंदू संमेलनाचे आयोजन सकल हिंदू समाज एकत्र येऊन आपल्या संस्कृतीच्या अभिमान जागविणे भक्ती शक्ती...

सासवड बापदेव घाट कोंढवा रोड उद्या सकाळी सात वाजल्यापासून हिंदू जन...

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड बापदेव घाट कोंढवा रोड उद्या सकाळी साडे सात वाजल्यापासून हिंदू जन आक्रोश मोर्चा मुळे बंद राहणार वाहन चालकांनी या पर्यायी मार्गाचा...

निलम गायकवाडचा खून करणाऱ्या नराधमाला फाशी द्या पुरंदर तालुक्यातील विविध पक्षांच्या...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज पुरंदर : माळशिरस येथील २१ वर्षीय तरुणी निलम महेंद्र गायकवाड हिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची...

error: Content is protected !!