प्रतिनिधी द महाराष्ट्र न्यूज:सासवड पोलीस स्टेशनमध्ये नुकतेच पदभार स्वीकारलेले संतोष घोलवे यांच्यासमोर सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध हुक्का पार्लरवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान उभे आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार झेंडेवाडी भिवरी
ऑस्करवाडी येथील हुक्का पार्लर रात्री उशिरापर्यंत, अगदी पहाटे १ ते १.३० वाजेपर्यंत सुरू राहत असल्याची चर्चा आहे.
हुक्का पार्लरमध्ये अल्पवयीन तरुणांची वर्दळ रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे व्यवहार तसेच नियमांचे उल्लंघन
होत असल्याबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात असल्याचे सांगितले जाते. अशा पार्लरमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे
नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष घोलवे हे गुन्हेगारीविरोधी कारवाईसाठी ओळखले जातात. त्यामुळे
त्यांच्या नेतृत्वाखाली सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध हुक्का पार्लरवर विशेष मोहीम राबवली जाणार का हे हुक्का पार्लर चालूंच राहणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून नियमित तपासण्या अचानक छापे
आणि संबंधित परवानग्यांची पडताळणी केल्यास अशा व्यवसायांवर आळा बसू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान कोणतेही हुक्का पार्लर नियमबाह्य पद्धतीने चालत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू
राहणाऱ्या अवैध हुक्का पार्लरना आळा घालण्यात पोलीस निरीक्षक संतोष घोलवे यांना कितपत यश मिळते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















