प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज : पुरंदर तालुक्यातील या गावात पोलिसांना बाल विवाह रोखण्यात यश मिळाले आहे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावच्या हद्दीत माळवस्ती येथे अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्यात येणार होता
माळवस्ती येथे जेजुरी पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन कारवाई करत विवाह सोहळा रोखला या प्रकरणी गुळुंचे
गावच्या पोलीस पाटील यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात खबर दिली असून गणेश पोपट जाधव(वय २७ वर्ष) मंदाबाई
पोपट जाधव दोघे रा. माळशिरस पुरंदर लता लहुजी गोरगल लहुजी रामचंद्र गोरगल दोघे रा.गुळुंचे आणि किरण यबुप्रसाद पौडेल रा. दत्तघाट पाडेगाव या पाच
जणांविरोधात बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे
कलम ९, १० व ११ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पुढील तपास पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार करे करीत आहेत

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















