प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांची सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करण्यात
अपयश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल
यांच्या आदेशानुसार त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संतोष घोळवे यांची सासवड पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
पोलीस प्रशासनाकडून नुकतेच त्यांचे अधिकृत नियुक्ती आदेश जारी करण्यात आले असून त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. नवनियुक्त पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे पोलीस दलातील त्यांच्या
कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि अनुभवी कार्यपद्धतीसाठी ओळखले जातात. सासवड शहर आणि पुरंदर तालुक्याचा
वाढता विस्तार, आणि वाढती लोकसंख्या पाहता, या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी स्थानिक पातळीवरील शांतता टिकवून ठेवण्याला आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय
मिळवून देण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल असे स्पष्ट केले. यासोबतच, पुरंदर तालुक्यातील वाढती वाहतूक कोंडी, अमली पदार्थांची विक्री, अवैध धंदे आणि इतर गुन्हेगारी कारवायांवर कडक कायदेशीर कारवाई करत
गुन्हेगारांवर वचक निर्माण केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे
सासवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत चालणारे अवैद्य धंदे कायमस्वरूपी बंद करणार का याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















