प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज सासवड, दि. २० जून २०२६ पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथे मध्यरात्री सुरू असलेल्या एका हुक्का बारवर सासवड पोलिसांनी धाड टाकून अवैधरित्या ग्राहकांना हुक्का पुरवणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत हुक्का साहित्य
तंबाखुजन्य पदार्थ आणि रोख रक्कम असा एकूण २५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० जून २०२६ रोजी पहाटे १२.३५ वाजण्याच्या सुमारास मौजे आस्करवाडी
(ता. पुरंदर, जि. पुणे) येथील द वॉटर पाईप हॉटेलमध्ये अवैधरित्या हुक्का बार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सासवड पोलिसांनी छापा टाकला असता ग्राहकांना धूम्रपानासाठी हुक्का पुरवून व्यवसाय
सुरू असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी शुभम महेश ढमे (वय २९, सध्या रा. कदम प्लाझा भारती विद्यापीठ कात्रज, पुणे, मूळ रा. कसबा
बारामती) आणि मिनहाजुल जाहीदुल इस्लाम (वय २४ सध्या रा. द वॉटर पाईप हॉटेल, आस्करवाडी, मूळ रा. दक्षिण २४ परगणा, पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे
कारवाईदरम्यान पोलिसांनी पाच काचेचे हुक्का पॉट
विविध कंपन्यांच्या फ्लेवरयुक्त तंबाखुजन्य पदार्थांचे नऊ डबे, पाच मातीच्या चिलीम, फिल्टर पाईपचे पॅकेट पाच रबरी हुक्का पाईप तसेच ३ हजार रुपयांची रोख रक्कम
जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २५,८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले
या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७४/२०२६ नुसार सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ व २१-अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या संदर्भात पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश किवळे यांनी फिर्याद दिली असून गुन्ह्याची नोंद दि. २० जून २०२६ रोजी पहाटे ४.०३ वाजता करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार हाके करीत आहेत.
स्थानिक परिसरात हुक्का बारविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, युवकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अशा
बेकायदेशीर व्यवसायांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी दिला आहे

मुख्य संपादक – अझीम अत्तार



















