Homeताज्या बातम्यानीरेतील धाडसी पोलिसांचा मराठी पत्रकार परिषद व पत्रकार संघाकडून सत्कार...

नीरेतील धाडसी पोलिसांचा मराठी पत्रकार परिषद व पत्रकार संघाकडून सत्कार…

प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज :

भोर तालुक्यातील कापूरहोळ येथून अपहरण झालेल्या तरुणाची सिनेस्टाईल पाठलाग करून सुखरूप सुटका करणाऱ्या नीरा पोलिसांचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ आणि नीरा प्रेस क्लब यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या धाडसी

कारवाईमुळे परिसरात पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मंगळवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास कापूरहोळ येथील व्यावसायिक लखन दळवी यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्ते नीरा दिशेने निघाल्याची माहिती मिळताच नीरा दूरक्षेत्रातील पोलिसांनी तात्काळ

शहरात नाकाबंदी केली. तसेच अपहरणकर्ते ज्या मार्गाने येण्याची शक्यता होती त्या दिशेने पोलीस वाहनासह धाव घेतली

पोलिसांची चाहूल लागताच अपहरणकर्त्यांनी मुख्य रस्ता सोडून कच्च्या मार्गाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग कायम ठेवला. घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी तरुणाला चालत्या गाडीतून रस्त्यावर

ढकलून दिले. पोलिसांनी तत्काळ त्या मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले आणि पुढील पाठलाग सुरूच ठेवला.
पुढे जाऊन अपहरणकर्त्यांची कार उसाच्या शेतात अडकल्याने त्यांनी पळ काढला. पोलिसांनी मांडकी गावाच्या हद्दीत पाचपैकी दोन आरोपींना ताब्यात घेतले. अपहरणकर्त्यांकडे कोयता चाकू आणि रिव्हॉल्व्हर अशी घातक शस्त्रे होती. तरीही पोलिसांनी प्रसंगावधान राखत

धाडसाने कारवाई केली. सुटका केलेल्या तरुणाला पुढील कार्यवाहीसाठी राजगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
या धाडसी कारवाईत नीरा दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कोकरे पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र करे आणि प्रसाद कोळेकर यांनी विशेष धाडस दाखवले. त्यांच्या तत्परतेमुळे एका तरुणाचे प्राण वाचले.

या कामगिरीबद्दल पुरंदर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य सहसचिव राहुल शिंदे, पुणे जिल्हा मीडिया परिषदेचे अध्यक्ष व मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भारत निगडे, डिजिटल

मीडिया परिषदेचे सचिव स्वप्निल कांबळे तसेच मोहम्मद गौस आतार यांनी नीरा पोलीस चौकीत जाऊन तिन्ही पोलिसांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांच्या धाडसी कारवाईचे कौतुक करत पुढील कारकीर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या संपूर्ण कारवाईमुळे नीरा परिसरात पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला असून नागरिकांकडून धाडसी पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

नीरा परिसरात यापूर्वी दोन अपहरण प्रकरणांत दुर्दैवाने मुलांचा मृत्यू झाला होता. मात्र यावेळी पोलिसांनी स्वतःच्या

सुरक्षिततेची पर्वा न करता तातडीने कारवाई करत मुलाची सुटका केली. अशी जोखीम पत्करणाऱ्या पोलिसांचा राज्य सरकारनेही सन्मान करावा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ढुमेवाडीजवळ फॉरच्यूनरची दुचाकीला धडक युवक गंभीर जखमी अपघातानंतर चालक पसार सासवड पोलिसांत गुन्हा

0
प्रतिनिधी द.महाराष्ट्र न्यूज सासवड : पुणे–सासवड मार्गावरील ढुमेवाडी (ता. पुरंदर) गावच्या हद्दीत भरधाव फॉरच्यूनरने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता....

२३ वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी हत्या चौघे जेरबंद शिंदेवाडीतील कात्रज जुन्या बोगद्याजवळील खूनप्रकरणाचा उलगडा;...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज भोर : शिंदेवाडी (ता. भोर) गावच्या हद्दीत कात्रज जुन्या बोगद्याजवळ झालेल्या संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०) यांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात...

जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यातून महिलेचे ५० हजारांचे मिनी गंठण लंपास गर्दीचा फायदा घेत...

0
प्रतिनिधी द .महाराष्ट्र न्यूज जेजुरी येथील श्री खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात महिलेने...

जमिनीच्या व्यवहारावरून कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सासवडमध्ये...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज : जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरून सासवड शहरातील एका कार्यालयात घुसून व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवत एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार रविवार,...

जेजुरीत वृद्ध महिलेची हातचलाखीने ४२ हजारांची फसवणूक सोन्याचे दागिने रुमालात गुंडाळून देतो असे सांगत...

0
प्रतिनिधी द. महाराष्ट्र न्यूज  : जेजुरी शहरातील शिवानंद हॉटेलजवळ टपरीवर बसलेल्या ६५ वर्षीय महिलेची हातचलाखीने ४२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची घटना शनिवार...

error: Content is protected !!